ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं
मनोरंजन

ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं

मॉन्टदुरास: १९७५ साली आलेल्या ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटात खलनायकी नर्सची भूमिका करणाऱ्या ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. लुई फ्लेचर यांनी २३ सप्टेंबर रोजी फ्रान्समधील मॉन्टदुरास याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. लुईस यांनी झोपेतच या जगाचा निरोप घेतला. त्यांचे एजंट डेव्हिड शॉल यांनी शुक्रवारी असोसिएटेड प्रेसला याविषयी माहिती दिली असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लुईस यांच्या विविध भूमिका चाहत्यांना नेहमीच आठवणीत राहणाऱ्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा लुईस यांना दिग्दर्शक मिलोस फोरमन यांनी ‘कुकूज नेस्ट’मध्ये नर्सच्या भूमिकेसाठी कास्ट केले होते तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. प्रेक्षकांसाठी त्यांचा चेहरा नवीन होता. ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ हा सिनेमा १९३४ च्या ‘इट हॅपनड वन नाईट’ नंतरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट कथा जिंकणारा पहिला चित्रपट ठरला.

लुईस शेवटचे नेटफ्लिक्सच्या एका कॉमेडी सीरिजमध्ये दिसल्या होत्या. २०१७ साली ही ‘गर्लबॉस’ नावाची विनोदी सीरिज आली होती, त्यात त्यांनी काम केलेले. १९५८ पासून त्यांनी ‘लॉमन’ या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यानंतर त्या टीव्ही मालिका Maverick मध्ये दिसलेल्या. करिअरसोबतच लुईस यांचे वैयक्तिक आयुष्यही विशेष चर्चेत होते. लुईस फ्लेचर यांनी १९६० सालीनिर्माता बेरी झिकशी लग्न केले पण १९७७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. लुईस यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी ११ वर्षांचा ब्रेक घेतला होता.