कर्णाची कथा मोठ्या पडद्यावर; ‘आप’चा माजी नेता करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

कर्णाची कथा मोठ्या पडद्यावर; ‘आप’चा माजी नेता करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टायटल लोगो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा लोगो शेअर केला आहे. यात भव्यदिव्य सेट, आकर्षक ग्राफिक्सचा वापर आपल्याला दिसतो आहेच. हा चित्रपट एक बिगबजेट चित्रपट असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम आदमी पक्षाचे माजी नेते डॉ. कुमार विश्वास हे या चित्रपटाचे संवाद लिहित आहेत. कवितेच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचलेले कुमार विश्वास हे पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत.

हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातली कर्णाची भूमिका कोण करणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे. पण, अद्याप या चित्रपटातल्या कलाकारांबद्दल काही माहिती मिळालेली नाही. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आर. एस. विमल यांचं असून जॅकी भगनानी, वासू भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांची ही निर्मिती आहे.