राजामौलीचा RRR परदेशात सतत मारतोय डंका; ऑस्करच्या आधी ‘या’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर कोरले नाव
मनोरंजन

राजामौलीचा RRR परदेशात सतत मारतोय डंका; ऑस्करच्या आधी ‘या’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर कोरले नाव

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला भारतासोबतच विदेशातील प्रेक्षकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर रेकॉर्डब्रेक कमाई तर केलीच पण अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची देखील कमाई केली. 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाने एक नवीन विक्रम केला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून इतिहास रचला. तर आता चित्रपट ऑस्कर 2023 च्या शर्यतीत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाबद्दल अजून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट रोज नवनवीन यश मिळवत आहे. या चित्रपटाला ऑस्करची प्रतीक्षा असताना आता त्यापूर्वी या चित्रपटाने अजून एक आंतराष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. RRR ने हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स जिंकले आहेत. या चित्रपटाने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत.

एसएस राजामौली यांच्या चित्रपटांनी देशाचा गौरव केला आहे. नुकत्याच झालेल्या हॉलिवूड फिल्म क्रिटिक्स सोसायटी अवॉर्ड्समध्ये RRR ने तीन श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. ऑस्करच्या आधी 12 मार्च रोजी पुरस्कार सोहळा झाला, ज्यामध्ये Jr NTR आणि राम चरण अभिनीत RRR ने तीन पुरस्कार जिंकले.

हॉलीवूड फिल्म क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRR ने सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट गाणे (नाटू नातू) जिंकले. चित्रपटाचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे. SS राजामौली दिग्दर्शक RRR साठी 2023 च्या ऑस्करपूर्वी ही एक मोठी उपलब्धी आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नातू नातूला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.