शेवंता येणार! पांडूने पाहिली, तुम्ही पाहिली का?
मनोरंजन

शेवंता येणार! पांडूने पाहिली, तुम्ही पाहिली का?

मुंबई : रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरु होऊन काही दिवस लोटले तरी मात्र सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय ती म्हणजे शेवंताला पाहण्याची. मालिकेच्या आधीच्या भागात अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे मालिकेच्या तिसऱ्या भागात शेवंताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यातच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेवंता कधी भेटीला येणार हे सांगण्यात आलं आहे. झी मराठीने शेवंताच्या डोळ्यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती कधी येणार हे सांगण्यात आलं आहे. मात्र यासाठी हा फोटो निरखून पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा फोटो निरखूवन पाहिलात तरच तुम्हाला शेवंता कधी येणार हे जाणून घेता येणार आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1377463229308231685/photo/1

झी मराठीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. शेवंता येणार पण कधी ते जाणून घेण्यासाठी फोनचा brightness वाढवा. फोटोचा ब्राईनेस वाढलल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलचं. तसचं शेवंताच्या अनेक फॅन्सचा हिरमोड झाला असेल. कारण या फोटोतून एप्रिल फूल बनवण्यात आलं आहे. त्यामुळे शेवंता येण्याचा नेमका दिवस प्रेक्षकांना अजून कळालेला नाही. असं असलं तरी शेवंता लवकच चाहत्यांच्या भेटीला या मालिकेतून येणार आहे. कारण शेवंतानेच म्हणजेच अपूर्वा सुभेदारने तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ती येत असल्याचं सांगितलं आहे. पांडूला आरश्यामध्ये शेवंता दिसली आहे. त्यामुळे लवकरच येत्या भागात शेवंता प्रत्यक्ष भेटीला येणार आहे.