आर्ची दिसणार हिंदी चित्रपटात; चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

आर्ची दिसणार हिंदी चित्रपटात; चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘सैराटफेम’ आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. रिंकू आता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. रिंकूने सैराटच्या यशानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘सैराट’ फेम आर्ची आता ‘हंर्डेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर ऍमेझॉनवरील अनपॉज्ड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुवारी ऍमेझॉन प्राइमने अनपोज्ड या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या चित्रपटात रिंकू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अनपॉज्झ’मध्ये पाच शॉर्ट फिल्म्स एकत्र असणार आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच गुणवंत दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. १८ डिसेंबरला हा वोगळ्या थाटणीचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.