नेटफ्लिक्सवर रिलीज होणार रितेश देशमुखचा नवा चित्रपट
मनोरंजन

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार रितेश देशमुखचा नवा चित्रपट

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या फ्रेडी आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे शशांक घोष हे रितेशच्या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केलाय. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असलेला दिसून येतोय. तसंच नुकतंच घटस्फोटीत आणि सुखी असं लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसून येतेय. तर त्याने शेअर केलेल्या आणखी दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्यासमोर अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील दिसून येतेय. त्यामूळे या चित्रपटाच्या कहाणीबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

प्लॅन ए प्लॅन बी हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा एका मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीलाभोवती फिरते. यात त्याचं स्वतःचं एक रहस्य आहे. मॅचमेकरला वाटतं की त्याच्याशिवाय प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे. जेव्हा मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीस हे दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा चित्रपटात काय मजेदार कहाणी घडू शकते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.