26/11 वर येणार चित्रपट; सई मांजरेकरची भूमिका महत्वाची
मनोरंजन

26/11 वर येणार चित्रपट; सई मांजरेकरची भूमिका महत्वाची

मुंबई : 26/11 आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येत असून या चित्रपटातील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटात अभिनेत्री सई मांजरेकर प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर यांची कन्या सईचा हा दुसरा चित्रपट असून मेजर चित्रपटात सई मेजरच्या म्हणजेच संदिपच्या प्रेयसीचं पात्र साकारत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फर्स्ट लूकमध्ये ती शाळकरी मुलगी दिसत आहे. चित्रपटात सईचा सोळा वर्ष ते २८ वर्ष असा प्रवास आहे. ज्यात ती कशाप्रकारे मेजर संदिपच्या प्रेमात पडली याची कथा उलगडणार आहे. चित्रपटात अदिवी शेष दाक्षिणात्य अभिनेता मेजर संदिप यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट तेलुगू आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. सई यासाठी खास तेलुगू भाषेचं प्रशिक्षण घेतलं आहे.

विशेष म्हणजे तेलुगू भाषेसाठी सईने कोणत्याही डबिंग आर्टिस्ट मदत घेतली नाही. तर तिने स्वत: यासाठी भाषेवर काम केलं आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूक नंतरच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. तर येत्या 12 एप्रिलला चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोभिता धूलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2 जुलै 2021ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सशी किरण टिक्का यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सोनी पिक्चर फिल्म्स इंडिया आणि महेश बाबूचे जी.एम .बी एंटरटेनमेंट अँड ए प्लस एस मूवीज निर्मिती करत आहेत.