समंथाला करायचाय ‘या’ बॉलिवूड स्टारसोबत रोमांस
मनोरंजन

समंथाला करायचाय ‘या’ बॉलिवूड स्टारसोबत रोमांस

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी द फॅमिली मॅन सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये समांथा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये समांथाने बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासोबत रोमांस करण्याची इच्छा व्यक्त केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समांथाने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये समांथाने तिला कोणत्या बॉलिवूड कलाकारासोबत ऑनस्क्रिन रोमांस करायला आवडेल हे सांगितले आहे. समांथाने अभिनेता रणबीर कपूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

द फॅमिली मॅन या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.