मनोरंजन

म्हणून ही गायिका ‘बिग बॉस १४’मधून पडली बाहेर

‘बिग बॉस १४’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये नेहमीप्रमाणे नवे वाद सुरू झाले आहेत. या आठवड्यात पंजाबी गायिका सारा गुरपाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. तिला घरातून बाहेर पडण्यात अजिबात आनंद झालेला नाही. कारण ती अन्य कोणत्याही कारणामुळं नाही तर गेल्या हंगामातील विजेता सिद्धार्थ शुक्लामुळे बाहेर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘बिग बॉस १४’ च्या घराबाहेर पडताच साराने मीडियासमोर सिद्धार्थविषयी बरेच काही सांगितले आणि अभिनेत्याबरोबर टास्क मध्ये सहकार्य न केल्यामुळे बाहेर आले असे तिने सांगितले. एका वेबसाइटशी बोलताना सारा म्हणाली की ‘मला आश्चर्य वाटले की शेवटी मला कशा पद्धतीने घरातून बाहेर काढण्यात आले?

मी एक आठवडाभर चाहत्यांचे मनोरंजन केले नाही असं मला नाही वाटत किंवा खेळ चांगला खेळला नाही, असे मला कुठेही वाटले नाही. बिग बॉसच्या घरी जाण्यासाठी, माझे केस कापले. माझ्या डोळ्याना दुखापत झाली. मी घरातील कामेही केली. सर्व टास्क पूर्ण केले. असे कोणतेही काम नाही जे मी केले नाही. पण, माहित नाही मला घराबाहेर का काढले. ”मैं उनकी गोद में नहीं नाची इसलिए घर से बाहर हूं” असं सारा म्हणाली.

सारा पुढे म्हणाली, ”निक्की तांबोळी सोडून माझ्या घरी सर्वांशी चांगले संबंध होते. जेव्हा प्रत्येकजण माझ्या हालचालीबद्दल विचारत होता, तेव्हा ती माझ्याकडे एकदाही आली नव्हती. कोणालाही मी घराबाहेर जाण्याची इच्छा नव्हती. गौहर खान आणि हिना खान यांना सुद्धा वाटत नव्हते मी बाहेर जावे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत