माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट
मनोरंजन

माझ्या नवऱ्याची बायको’मधून शनाया पुन्हा घेणार एक्झिट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका गेली तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतल्या व्यक्तिरेखाही नेहमीच चर्चेत राहतात. त्यात शनाया तर सर्व प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनीलच्या सहज अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. आता तिच्याबद्दलचीच एक बातमी समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया हे पात्र लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. रसिका सुनीलला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असल्याने तिचे फॅन्स तिला मिस करणार यात काहीच शंका नाही. गॅरीची पहिली पत्नी राधिका आणि तिची तर आता घट्ट मैत्री झाली आहे. शनाया आणि राधिकाला गॅरीने धोका दिल्यानंतर त्या दोघी आता त्याला चांगलाच धडा शिकवताना दिसत आहेत.

मालिकेत सध्या शनाया आरजेची भूमिकेत असून बिंदू राणी बनून लोकांना रिलेशनशिपविषयी टिप्स देत आहे.  याच काळात तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आल्याचे दिसत आहे. आता पुढील काही भागांमध्ये शनाया आणि तिच्या या पूर्वप्रियकराचे लग्न होणार आहे आणि शनाया त्याच्यासोबत परदेशात स्थायिक होणार असल्याचे मालिकेत दाखण्यात येणार आहे. या कथानकानुसार शनायाचे पात्र या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडल्यावर तिची जागा इशाने घेतली होती. पण आता शनायाच्या भूमिकेत दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला न घेता हे पात्रच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मधल्या काळात रसिका शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यामुळे मालिकेतून तिची एक्झिट झाली होती. तिच्या जागी अभिनेत्री इशा केसकरची वर्णी लागली होती. आता पुन्हा एकदा रसिका अमेरिकेला जाणार असल्याचं समजतंय. यामुळे तिची पुन्हा एकदा मालिकेतून एक्झिट होणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण, यावेळी तिच्या जागी दुसरं कोणीही येणार नाहीय.