आता शितलीच्या लग्नाची चर्चा; शिवानी बावकरची वाजली पिपाणी
मनोरंजन

आता शितलीच्या लग्नाची चर्चा; शिवानी बावकरची वाजली पिपाणी

मुंबई : अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकरच्या झी मराठीवरील लागिर झालं जी मालिकेतील शितली या भूमिकेने तिला अनेकांच्या मनात स्थान मिळवून दिले. या मालिकेतील तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. आता ही शितली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चा शिवानीचा नवा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या लग्नाची पिपाणी या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसत आहे.

म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे. दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे. अलिबाग आणि जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. शिवानीचा लग्नाची पिपाणी हा म्युझिक अल्बम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती अनोख्या अंदाजात दिसत आहे. तसेच सचिन आणि शिवानीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यामुळे शिवानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.