धक्कादायक! बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाक’चा अपघाती मृत्यू
मनोरंजन

धक्कादायक! बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाक’चा अपघाती मृत्यू

मुंबई : ‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे एका अपघातात निधन झाले. पिस्ता धाकड २४ वर्षांची होती. वीकेंड का वॉरच्या शूटींगनंतर हा अपघात झाला. 24 वर्षांच्या पिस्ताच्या निधनाने ‘बिग बॉस 14’च्या सेटवर शोककळा पसरली आहे. पिस्ता धाकड ‘बिग बॉस’ शोची निर्मिती करणाऱ्या एंडेमोल शाईन इंडिया कंपनीचा भाग होती. अनेक टीव्ही स्टार्सनी तिच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, कलर्सच्या प्रोग्रामिंग टीमची सदस्य आणि ‘बिग बॉस 14’मध्ये मुख्य असिस्टंट कोआॅर्डिनेटर म्हणून पिस्ता काम करत होती. ‘वीकेंड का वॉर’च्या शूटींगनंतर पिस्ता तिच्या दुचाकीने घरी परतत असताना फिल्म सिटीत हा अपघात झाला. रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी स्लिप होऊन रस्त्यावरच्या खड्ड्यात गेली आणि मागून आलेल्या व्हॅनिटी व्हॅनने तिला चिरडले. या अपघातात पिस्ता गंभीर जखमी झाली आणि अधिक रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

https://www.instagram.com/p/CKGYyqZJjhb/?utm_source=ig_web_copy_link

पिस्ता ही ‘बिग बॉस 14’ शो बनवणारी प्रॉडक्शन कंपनी एंडमोल शाइन इंडियात काम करत होती. बिग बॉसच नाही तर अन्य शोसाठीही तिने काम केले आहे. यात फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी, द व्हॉईसचा समावेश आहे. पिस्ताच्या निधनावर विकास शर्मा, हिमांशी खुराणा, देवोलिना भट्टाचार्यजी, काम्या पंजाबी, प्रिंस नरूला आदींनी शोक व्यक्त केला आहे.

पिस्ता धाकडच्या अकाली मृत्यूमुळे काम्या पंजाबी, हिमांशी खुराना, युविका चौधरी या साऱ्यांनाच धक्का बसला आहे. हे सर्व सेलिब्रिटी पिस्ताला जवळून ओळखत होते आणि ते सारेच बिग बॉसच्या आधीच्या पर्वाचे स्पर्धकही होते. बिग बॉस १३ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या हिमांशीने पिस्ताचा सलमानसोबतचा फोटो शेअर करत ‘RIP पिस्ता. तिच्या निधनाबद्दल कळलं. अजूनही मी शॉकमध्ये आहे. आयुष्याबद्दल खरंच काही सांगता येत नाही.’ असं कॅप्शन लिहिलं.

काम्या पंजाबीने इन्स्टाग्रामवर पिस्ताचा सेल्फी शेअर केला आणि लिहिले की, ‘ही पिस्ता धाकड आहे, फक्त २३ वर्षांची. गेल्या काही वर्षांपासून ती बिग बॉसच्या टीमचा भाग होती. ती अतिशय हुशार होती. पण काल रात्री ती आम्हा साऱ्यांना सोडून गेली. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.’
तर, युविका चौधरीने पिस्तासोबतचा जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत लिहिलं की ‘तू इतक्या लवकर आम्हाला सोडून का गेलीस? माझा यावर अजूनही विश्वास बसत नाहीए.’