धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मावस भावासह एकावर जीवघेणा हल्ला
मनोरंजन

धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मावस भावासह एकावर जीवघेणा हल्ला

सहरसा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने याने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेने सुशांत सिंहच्या कुटुंबीयांसह त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाली असून राजकुमार चा सहकारी अली हसन याची प्रकृती चिंताजनक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे. बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत. राजकुमार सिंह दररोजप्रमाणे आज मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना बैजनाथपूर चौकात पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांना गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकारी आली हसनला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे.

तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, दोघांतील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजकुमार यांचं पायाला तर सली हसन यांच्या कमरेच्या जवळ गोळी लागली. तथापि, या दोघांवर मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला का केला, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस विविध पुरावे शोधण्याचा काम करत आहेत. तसेच आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही टिपलं गेलं आहे का? याचा तपासही करत आहेत.