सोनाक्षी म्हणते, ‘वयाच्या ३० वर्षांच्या आत मला माझं स्वप्न पूर्ण करायचे होते अन् ते झालं’
मनोरंजन

सोनाक्षी म्हणते, ‘वयाच्या ३० वर्षांच्या आत मला माझं स्वप्न पूर्ण करायचे होते अन् ते झालं’

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नवीन घर खरेदी केलं आहे. पिंकव्हिलानुसार, सोनाक्षीने मुंबईतील वांद्रे येथे ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं आहे. वांद्र्यातील बांद्रा रिक्लेमेशन या भागात सोनाक्षीने तिचं नवीन घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं असं सोनाक्षीने म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत मला माझं हक्काचं, स्वत:चं घर खरेदी करायचं होतं. मला माझ्या कष्टाच्याच पैशांमध्ये हे घर खरेदी करायचं होतं. तसं मला बराच वेळ लागला आहे. पण अखेरकार माझं स्वप्न साकार झालं आहे, असं सोनाक्षी म्हणाली.

पुढे ती म्हणते, मी नवीन घर जरी खरेदी केलं असलं तरीदेखील मी माझ्या आई-वडिलांसोबतच राहणार आहे. मला आई-वडिलांसोबत रहायला जास्त आवडतं. जुहूतील घर सोडून जाण्याचा माझा कोणताच विचार नाही. मला केवळ माझं हक्काचं घर खरेदी करायचं होतं. ते मी केलं आहे आणि हीच माझी खरी गुंतवणूक आहे.