महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढवली चिंता
मनोरंजन

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांची वाढवली चिंता

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. शनिवारी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याच खुद्द बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी… आणखी जास्त मी लिहू शकत नाही, एबी…’, असे त्यांनी लिहिले. त्यांचा हा ब्लॉग वाचताच, चाहते चिंतीत झालेत. इतकेच नव्हे तर त्यांनी केलेल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम पोस्टनेही चाहत्यांच्या चिंतेत भर घातली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह तेवढी लिहिलीत. ‘कुछ जरूरत से ज्यादा बढ गया है, कुछ काटने पर सुधरने वाला है… जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे वे…,’ असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान सध्या तरी अमिताभ यांच्यावर नेमकी कोणती सर्जरी केली जाणार आहे, आणि ती कधी आणि कुठे केली जाणार आहे, या गोष्टीची माहिती कोणालाच अजूनही समजली नाही. सर्जरी झाली आहे, की होणार आहे हेही स्पष्ट नाही. मात्र, आता चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित झुंड चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपटाची रिलीज तारीखही जाहिर केली होती. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते. बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.

झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्चीरपटाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. नागराज मंजुळेने या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली. ज्या विजय बारसेंवर झुंड हा चित्रपट आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.