मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूला ४ महिने पूर्ण; बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला जगाचा निरोप घेऊन ४ महिने झाले आहेत. सुशांत १४ जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. या घटनेला चार महिने पूर्ण झाल्यानंतर सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर सुशांतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या व्हिडिओमध्ये सुशांत कठोर परिश्रम करत असल्याचे दिसत आहे. मोठ्या तलावाच्या काठावर असलेला सुशांत, यानंतर, पर्वत, समुद्राचा किनारा आणि रस्त्यावर धावताना , सायकल चालवतानाही दिसतो. तो समुद्रकिनाऱ्यावर स्किपिंग आणि हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर त्याचा आवाज आहे आणि त्याच्याबरोबर हार्डकोर संगीत आहे. व्हिडिओवर कॅप्शन आहे- ‘एक सच्ची प्रेरणा’ #अमरसुशांत । या व्हिडिओद्वारे सुशांतच्या चाहत्यांना त्यांचे स्मरण झाले आहे.

सुशांतची बहीण श्वेता तिच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ती सुशांतच्या चाहत्यांना ती कुटुंबच मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘मन की बात ४ एसएसआर’ उपक्रमासाठी व्हॉईस मेसेज पाठविण्याचे आवाहन तिनं सुशांतच्या चाहत्यांना केले होते. सुशांतनं आत्महत्या केली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि सुशांतचा वकील या अहवालावर असमाधानी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत