आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नुचे ट्वीट
मनोरंजन

आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नुचे ट्वीट

मुंबई : राज्यात एकीकडे मुकेश अंबानी प्रकरणाने खळबळ माजलेली असताना दुसरीकडे आयकर विभागाने बॉलीवूड कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयावर मारलेल्या छापेमारीचे प्रकरणही जोर धरू लागले आहे. आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यासह इतर कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी करत कारवाई केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू तपास यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा हिशेब देण्यास असमर्थ असल्याचं आयकर विभागने म्हटलं आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज असताना तापसीने तीन ट्वीट करून आपली भूमिका माडंली आहे.

तापसीने ट्वीट करत अभिनेत्री कंगना रानौतवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तिने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत असल्याने पॅरिसमध्ये बंगला खरेदी करण्याचा सर्वात मोठा आरोप माझ्यावर झाला आहे. दुसर्‍या ट्वीटमध्ये तापसीने लिहिलं की, “माझ्यावर भविष्य घडवण्यासाठी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण मी यापूर्वी पैसे घेण्यास नकार दिला होता.”

दरम्यान, नुकत्याच झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं की, मी कुठल्याही खटल्याचा उल्लेख करणार नाही किंवा कोणाचेही नाव घेणार नाही. पण जेव्हा आमच्या सरकारच्या काळात अशी कारवाई होते तेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागतात. मात्र 2013 मध्ये एखाद्यावर कारवाई केली गेली होती, तर मग कुणीही प्रश्न उपस्थित का केला नाही.

याबाबत तिने तिसर्‍या ट्वीटतिने म्हंटल आहे की, “आमच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 च्या छापाच्या आठवणी ताज्या झाल्या ज्या माझ्यासोबत घडल्या. पुढे तापसीने म्हटलं की, “आता मी स्वस्त राहिली नाही.” कंगनाने सुरुवातीच्या वादादरम्यान तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हटलं होतं.