NCBने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय
मनोरंजन

NCBने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय

मुंबई : ”नार्कोटिक्स ब्यूरोनं ने रियाला या केसमध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणात ३३ आरोपींकडे अंमली पदार्थ सापडले आहेत ते सर्व मुंबई पोलीस किंवा नार्कोटिक्स सेल किंवा एअरपोर्ट कस्टमचा एक कॉन्स्टेबल एका रेडमध्ये जेवढे अंमली पदार्थ हस्तगत करतो त्यासमोर काहीच नाही आहे. पूर्ण NCB आता बॉलिवूमधील ड्रग्स अँगल समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीने न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींच्या नावासह 33 जणांचा समावेश आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींचा जबाबाचा समावेश आहे. आरोपपत्रात त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही. या सर्व घडामोडींवर रिया चक्रवर्तीनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मात्र आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारची चार्जशीट फाइल होईल याचा मला अगोदर अंदाज होता असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीवर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत सतीश मानेशिंदे म्हणाले, ”तपासात ज्या प्रसिद्ध व्यक्तींची चौकशी करण्यात आली त्यांच्याकडे क्वचित काहीतरी सापडलं आहे. मग असं का झालं? एकतर त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे होते. किंवा मग सत्य काय हे फक्त देवालाच माहीत आहे. चार्जशीटमध्ये लावण्यात आलेले सर्व आरोप हे आधारहीन किंवा कमकुवत आहेत. आणि एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ खाली रेकॉर्ड करण्यात आलेली स्टेटमेंट्स ही सुशांतसिंह राजपूतच्या केसवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर घेण्यात आलेली आहेत.’

त्याचबरोबर, याआधी NCB चीफ समीर वानखेडे यांनी सांगितलं होतं की, ३३ व्यक्तीवर चार्जशीट फाइल करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित लोकांचा तपास सुरू असून त्यांच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल. चार्जशीट फाइल झाल्यानंतर आता केसची ट्रायल सुरू होणार आहे. रियाला या केसमध्ये आरोपी म्हणून सिद्ध करण्यासाठी ही केस फाइल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयानेहमी जामिन देताना कोणत्याही प्रकारच्या ड्रग ट्रेडमध्ये फायन्सिंग झाल्याचं नाकारलं आहे. शेवटी आमचाच विजय होईल.” असंही त्यांनी म्हंटल आहे.