रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शरीरसुखाची मागणी; अभिनेत्रीचा आरोप
मनोरंजन

रोलसाठी दिग्दर्शकाने केली होती शरीरसुखाची मागणी; अभिनेत्रीचा आरोप

मुंबई : रोलसाठी दिग्दर्शकाने शरीरसुखाची मागणी केला असल्याचा धक्कादायत आरोप टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टने केला आहे. नुकतीच तिने अभिनयातील प्रवासाची 5 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने डोनलने या प्रवासातील काही चांगले, वाईट अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सिनेमा इंडस्ट्रीची झगमगती दुनिया बाहेरून जितकी आकर्षक आणि चांगली वाटते तितकी ती आतून आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो, असे ती म्हणाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल तो बच्चा है जी, रुप मर्द का नया स्वरुप आणि लाल इश्क आदी टीव्ही मालिकांमधून अभिनेत्री डोनल बिष्ट ही लोकप्रिय झाली आहे. तिने टीव्ही इंडस्ट्रीतील स्ट्रगलविषयी सांगितलेच पण एका दाक्षिणात्य फिल्ममेकरने एका रोलसाठी त्याच्यासोबत झोपण्यास देखील सांगितल्याचं डोनलनं मुंबई मिररशी बोलताना सांगितले.

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील एकाने चित्रपटातील रोलसाठी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत, सोबत झोपण्यास सांगितलं. मात्र, माझं काम हे माझ्यासाठी पूजा असल्यानं मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अजून थोडं स्ट्रगल बाकी असलं तरी मला विश्वास आहे की इंडस्ट्रीत मी माझा मार्ग निश्चित निर्माण करेन, असेही डोनलने सांगितले आहे.

डोनल बिष्टने आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल केल्याचं यावेळी सांगितलं. ती म्हणाली की, मी जर्नालिझमचे शिक्षण घेतलं आहे. ज्या इन्स्टिटयूटमधून मी हे शिक्षण घेतलं तिथे या कोर्सदरम्यान जास्त फोकस सिनेमा या विषयावर केला जातो. या कोर्समधील माझे सीनिअर मला शॉर्ट फिल्मस, नाटक, म्यूझिक व्हिडीओत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत. मी एक उत्कृष्ट अभिनेत्री होऊ शकते, असा त्यांना विश्वास होता. परंतु, मला पत्रकार व्हायचं होतं. एक वेळ अशी होती की एका शोसाठी माझी निवड करण्यात आली. मानधनाची रक्कम ठरली. तारखा देण्यात आल्या आणि एक दिवस अचानक मला त्या शो मधून काढून टाकण्यात आलं अन माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली, असं डोनल म्हणाली.