मानसीने जाहीर केली लग्नाची तारीख; ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न
मनोरंजन

मानसीने जाहीर केली लग्नाची तारीख; ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न

पुणे : मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तिने साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन तिच्या चाहत्यांना एकप्रकारे आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण, नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा १८ जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीला होईल असेही मानसीने सांगितले.

आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने ठरवले आहे, असे मानसीने सांगितले. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर मानसीची ही गाणी तुफान गाजली होती. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. मानसी नाईक आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाते.