अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल
मनोरंजन

अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल

मुंबई : अभिनेत्री सायरा बानूची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी म्हणून सायरा बानू यांनी त्यांना अखेरपर्यंत खंबीरपणे साथ दिली. नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं. आता सायरा बानू यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सायरा बानू यांना गेल्या तीन दिवसांपासून ब्लड प्रेशरचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची तब्येत स्टेबल आहे. पण रक्तदाब अजून नॉर्मल झालेला नाही. श्वास घ्यायला अडचण येत आहे. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतरच नेमका कुठला त्रास होतोय हे सांगता येईल, असं सांगण्यात येत आहे.

पती दिलीप कुमार यांच्या देहावसानानंतर सायरा बानू एकांतातच होत्या, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी जास्त सुरू झाल्या होत्या.