मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं ८८ व्या वर्षी आज (ता. ०४) राहत्या घरी निधन झालं. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. ७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जिवनात अनेक चढाव-उतार आले. असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.

वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. वडिलांचे दिवाळं निघाल्यामुळं हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईस आलं. त्यावेळेस शशीकला ७ ते ८ वर्षांची होत्या. तिथं त्यांची नूरजहाँसोबत गाठ पडली व तिला नूरजहाँ यांनी पारखले. त्यानंतर त्यांना झीनत या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळालं. त्यांच्या जुगनू व अजून ३-४ चित्रपटात ४०० रुपये महिन्याने त्यांनी कामे केली. नंतर त्यांच्याकडे तत्कालीन निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे लक्ष गेलं. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना तीन बत्ती चार रास्ता या चित्रपटात काम दिलं. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.

शशिकलाची संवाद फेकण्याची लकब व साजेसा अभिनय (भृकुटी व नेत्रांनी) या गुणांमुळे त्यांच्या निगेटिव्ह भूमिकाही उच्च अभिन‌ित असत. एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे त्यांनी १००पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. २००७ साली भारत सरकारनं शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी पद्मश्री किताबाने गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *