मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु; हळद, मेहंदीचे फोटो केले शेअर
मनोरंजन

मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु; हळद, मेहंदीचे फोटो केले शेअर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/p/CKX67-fJ7rx/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ आणि मिताली यांचा विविहसोहळा पुण्यात पार पडणार आहे. . ना सेलिब्रिटी असल्याचा दिखावा, ना अती झगमगाट पण तरीही जवळच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या उपस्थित गुरुवारी दोघांची हळद धुमधडाक्यात पार पडली. त्यानंतर आता गेल्या दोन तीन दिवसांपासून सिद्धार्थ आणि मिताली सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधी, सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.

https://www.instagram.com/p/CKX7K6VpvDT/?utm_source=ig_web_copy_link

याचे काही फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मितालीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सोहळ्यासाठी मिताली आणि सिद्धार्थ यांनी खास थीम ठेवली आहे. मितालीने हिरव्या आणि ऑफ व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर, सिद्धार्थनेदेखील हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे.

https://www.instagram.com/p/CKX7XJSJsAV/?utm_source=ig_web_copy_link

विशेष म्हणजे मितालीच्या या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यात तिची श्वान ‘डोरा’ही दिसून येत आहे. सिद्धार्थने देखील या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. दोन दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मिताली मुंबईहून पुण्याला गेले. त्यानंतर ग्रहमह विधी आणि सोड मुंजीचा विधी पार पडला. याचे फोटो सिद्धार्थनं शेअर केले आहेत.