मनोरंजन

विजय पाटकर, प्रियदर्शन जाधव यांचा राजकारणात प्रवेश; निवडला ‘हा’ पक्ष

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर आणि प्रियदर्शन जाधव यांनी राजकारणात प्रेवश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी काल (ता. ०९) मुंबईत हा पक्षप्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासोबतच, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. दरम्यान, यापूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांची पुणे जिल्हा सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत