विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती
मनोरंजन

विराट आणि अनुष्काकडे आहे तब्बल एवढी संपत्ती

मुंबई : भारतिय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या सर्वांचे लाडके सेलिब्रिटी कपल आहेत. बऱ्याचवेळा विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. त्या दोघांकडे मिळून एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फॉर्ब्स आणि जीक्यूने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०२०मध्ये विराट आणि अनुष्काकडे एकूण १२०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती पाहाता ते बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल असल्याचे म्हटले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१९मध्ये फॉर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० सेलिब्रिटींची यादी जाहिर केली होती. या यादीमध्ये विराट कोहलीचा समावेश होता. २०१९मध्ये विराटने २५२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी त्याच्याकडे एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये होती. अनुष्का विषयी बोलायचे झाले तर २०१९मध्ये अनुष्काने जवळपास २८ कोटी रुपये कमावले होते. तिची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये होती. विराट आणि अनुष्काचे मुंबईमध्ये आलिशान घर आहे. त्याच्या घराची किंमत जवळपास ३४ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. भारतिय संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी गमावाली असून उद्यापासून टी-२०स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उद्या दुपारी १२:३० वा. सामन्याला सुरुवात होणार आहे.