आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर
मनोरंजन

आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”आम्ही शंभर रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो तर देश वाचवण्यासाठी बसलो होतो, अशा शब्दात शाहीनबागच्या आंदोलनातील बिल्किस बानो आजीनी अभिनेत्री कंगना रनौतच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच, देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे.” असा टोलाही आजीनी लगावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने एक व्हिडिओच्या पोस्ट करत शाहीनबागच्या आजीवर “शाहीनबागची अशिक्षित आजी, तिला कोणतीही माहिती नसताना आंदोनलनात भाग घेते. अशा पध्दतीनं लोकांचा वापर करुन घेण्यात येतोय हे या लोकांना समजत नाही.’ असा आरोप केला होता.

या आरोपपाला उत्तर देताना आज्जी म्हणाल्या की, “कंगनादेखील आमच्या मुलीसारखी आहे. ती आम्हाला अशिक्षित म्हणाली. आम्ही ज्यावेळी मुलांना जन्म देतो त्यावेळी त्यांना कसं शिक्षण द्यायचं हे देखील आम्हाला माहित आहे. जामिया आणि जेएनयू मध्ये आमच्या मुलांना मारलं त्यावेळी ते आम्हाला सहन झालं नाही. पोलिसांचा हिंसाचार आम्हाला सहन झाला नाही.”

तसेच, “कंगनाला मी कधी पाहिलंही नाही. आम्ही शंभर रुपये मिळतात म्हणून आंदोलन करत नाही तर देशाला वाचवण्यासाठी आंदोलन करतोय. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, एका शेतकऱ्याची सून आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे.” असही आजीनी म्हंटल आहे.