केतकी माटेगावकरच्या घायाळ करणाऱ्या अदा पहिल्या का?
मनोरंजन

केतकी माटेगावकरच्या घायाळ करणाऱ्या अदा पहिल्या का?

टाईमपास या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या नजरेत भरलेली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर नेहमीच चर्चेत असते. टाईमपास’मधील प्राजूच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिच्या या प्रवासाला सात वर्ष होताहेत. केतकी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. तिचा लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र केतकीने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे. यातील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहे. केतकीच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. केतकीने तिच्या यावेळी केलेल्या फोटोशूट साठी तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केल्याचे दिसत आहे. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. ‘काकस्पर्श’, ‘तानी’ या सिनेमात देखील केतकी माटेगावकर झळकली आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

केतकी माटेगावकर आईबरोबर अनेक कार्यक्रमातून गाणे सादर करत असे, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी केतकीला जगभर प्रसिद्धी मिळाली. आजारपणामुळे तिला स्पर्धेतुन बाहेर पडावे लागले. दरम्यान केतकीने २०१२ मध्ये मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित शाळा या मराठी चित्रपटामार्फत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, मुळातच ही कादंबरी अतिशय गाजलेली असल्याने त्यावरील या चित्रपटास देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शालेय जीवन, पहिलं प्रेम अशा अनेक गोष्टींचं चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.