नववधूच्या पोशाखात यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा धनश्री वर्माचा डान्स होतोय व्हायरल; एकदा पहाच
मनोरंजन

नववधूच्या पोशाखात यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा धनश्री वर्माचा डान्स होतोय व्हायरल; एकदा पहाच

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू यजुवेन्द्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मादेखील सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत. धनश्रीच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा धुमाकूळ घालत असतात. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे नुकतेच लग्न झाले आहे. सध्या दोघे दुबईमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. मात्र आता तिचा असाच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या लग्नाच्या दिवसाचा आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री एकदम जोमात नाचताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धनश्री वर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती नववधूच्या पोशाखात दिसत आहे. तर ‘ अरे रे अरे’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. धनाश्री वर्माने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तर काही तासातच तीन लाखाहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तर एक हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा वधूच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितच्या दिल तो पागल है या सिनेमातील ‘अरे रे अरे …’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CJppBAQpO1B/?utm_source=ig_web_copy_link

धनश्री वर्मा पेशाने एक डान्सर आणि कोरिओग्राफर आहेत. तिच्या डान्सचे व्हिडिओ यूट्यूबवर खूपच लोकप्रिय आहेत. तिच्या या व्हिडिओचेही चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. धनश्री वर्माने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, श्रीमती चहल होण्यापूर्वी एक लहान नृत्य सत्र. ”ज्या कोणी नववधु इथे असतील त्या सर्व नववधूनी इथे डान्स करावा.” या गाण्यावर डान्स करताना धनश्रीचे हावभाव अगदी पाहण्यासारखे आहे. मात्र, धनश्री वर्माने हा पहिलाच डान्स केला नाही, यापूर्वीचे तिचे डान्सचे व्हिडीओदेखील असेच धुमाकूळ घालणारे आहेत.

तथापि, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी मागच्या महिन्यात 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले. युजवेंद्र चहलने सोशल मीडियाद्वारे आपल्या लग्नाची बातमी शेअर केली. लग्नानंतर दोघे आता हनिमूनसाठी दुबईमध्ये आहेत. तिथूनही दोघेही सुंदर व सुंदर चित्र शेअर करत आहेत. कधी अस्वल तर कधी जिराफांना खायला देताना त्यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.