२६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
इतिहास

२६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान होते.. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.

असे आहे भारतीय संविधान
भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेला 167 दिवस लागले, ज्यासाठी 11 सत्रे झाली. भारतीय राज्यघटनेच्या मूळ स्वरूपात 395 कलमे, 22 कलमे आणि 8 अनुसूची आहेत. आपल्या संविधानात एकूण 1,45,000 शब्द आहेत, जे संपूर्ण जगात सर्वात जास्त काळ स्वीकारलेले संविधान आहे. तथापि, सध्या आपल्या संविधानात 470 कलमे, 25 कलमे आणि 12 वेळापत्रके तसेच 5 परिशिष्टे आहेत.

संविधान दिन ही सुट्टी नाही
संविधान दिनाची सुट्टी नसून यानिमित्त विविध शासकीय विभाग, संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संविधानाची जाणीव वाढीस लागावी म्हणून शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध भाषणे, संवाद, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादींचे आयोजन केले जाते.