वसुंधरा दिन : तुम्हाला माहित आहे का हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?
इतिहास

वसुंधरा दिन : तुम्हाला माहित आहे का हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?

पुणे : आपण प्रत्येकजण पृथ्वीवर मुक्तपणे संचार करतो. त्याच पृथ्वीचा म्हणजेच वसुंधरेचा आज हक्काचा दिवस म्हणजे आपण साजरा करतो तो वसुंधरा दिन. निसर्ग- पर्यावरण यांचं मानवाशी घट्ट नातं आहे. त्यामुळे पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगात सर्वात जास्त हा दिवस साजरा केला जातो असेही म्हटले जाते,

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र हा दिवस साजरा करण्याची नेमकी सुरुवात कुठून झाली? अमेरिकेत 1970 साली खरंतर हा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता तेव्हा तेथे तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक लोक एकत्र आले होते. दरम्यान त्यांच्या या कृतीमुळे तेथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. अमेरिकेपासून सुरुवात झालेला हा दिवस 1990मध्ये संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला.

दरम्यान, सध्याच्या पर्यावरणाचा विचार केला तर पर्यावरणाचा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना दिसत आहे. विविध कारणाने निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. असा विचार करून जर सर्वांनी सुरुवात काळजी घ्यायला हवी.