इतिहास

१६ ऑक्टोबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

१६ ऑक्टोबर : दिनविशेष

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१३५५ – सिसिलीचा राजा लुईचे निधन
१४३० : स्कॉटलंडचा राजा जेम्स दुसरा याचा जन्म

१६७० : शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १७१६)
१७७५ : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

१७९३ : फ्रेन्च राज्यक्रांती-फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)
१८४१ : जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)

१८४० : जपानी पंतप्रधान कुरोदा कियोताका यांचा जन्म
१८४४ : अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९)

१८६९ : कार्डिफ जायंटचा शोध.
१८९० : मराठी समाजसुधारक अनंत हरी गद्रे यांचा जन्म

१९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर […]
१९०५ : लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला.

१९१४ : अफगाणिस्तानचा राजा झहीर शाह यांचा जन्म
१९१६ : मार्गारेट सॅंगरने प्लॅन्ड पेरंटहूड या संस्थेची स्थापना केली.

१९२३ : वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली.
१९४८ : हिंदी चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनीचा जन्म

१९५१ : पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या.
१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रपूर येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.

१९५९ : मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचा जन्म
१९७५ : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू जॅक कॅलिसचा जन्म

१९७५ : भारतीय क्रिकेट खेळाडू सदागोपान रमेशचा जन्म
१९७८ : जॉन पॉल दुसरा पोपपदी.

१९९१ : कायलीन, टेक्सास येथे जॉर्ज हेनार्डने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.

१९९६ : ग्वाटेमाला सिटीतील एस्तादियो मातियो फ्लोरेस या ३६,००० लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये ४७,००० लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीत ८४ ठार, १८० जखमी.

१९९८ : चिलीच्या भूतपूर्व हुकुमशहा जनरल ऑगुस्तो पिनोशेला खूनाच्या आरोपाखाली लंडनमध्ये अटक.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत