पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न
इतिहास

पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न

मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण इस्लाम धर्मातील व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु दोघांच्याही घरातील लोकांनी विरोध केल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. विजयालक्ष्मी यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या लग्नाला विरोध केला. अलाहाबादमध्ये राहणारं मोतीलाल नेहरू यांचं कुटुंब आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी परिचित होतं. पण तरीही विजयालक्ष्मी यांच्या लग्नाला विरोधच झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएत रशियामध्ये भारताच्या पहिल्या राजदूत होत्या. त्यानंतर अमेरिकेतदेखील त्यांनी राजदूत म्हणून काम केलं. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघातदेखील भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केलं. 18 ऑगस्ट 1900 ला अलाहाबादमध्ये त्यांच्या जन्म झाला. मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या मुस्लिम व्यक्तीबरोबरच्या लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांचं लग्न 1921 मध्ये काठियावाडचे सुप्रसिद्ध वकील रणजीत सीताराम पंडित यांच्याशी झालं. त्यांचे पती देखील स्वातंत्र्याच्या लढाईत आघाडीवर होते.

कोण होती ती व्यक्ती?
विजयालक्ष्मी ज्या तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या त्याचं नाव सय्यद हुसेन असं होतं. ते मुस्लिम होते. अतिशय हुशार, समृद्ध कुटुंबातील आणि शिकलेली ही व्यक्ती नंतर भारताचा राजदूतदेखील झाली. मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या इंडिपेंडेंट या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांना अलाहाबादमध्ये बोलावले होते. महात्मा गांधींचीही यांच्याशी त्यांची जवळीक होती. हुशार आणि प्रतिभावान व्यक्ती असलेल्या हुसेन यांचे जवाहरलाल नेहरू यांच्याशीदेखील चांगले संबंध होते.

अशा प्रकारे आकर्षित झाल्या विजयालक्ष्मी
सय्यद हुसेन संपादकपदी आल्यानंतर इंडिपेंडेंट खूप चर्चेत आले. त्यांची हेडिंग खूप आकर्षक असायची. त्यावेळी विजयालक्ष्मी 19 वर्षांच्या होत्या. त्या दररोज वृत्तपत्र कार्यालयात येत असत. संपादनाचे काम त्या शिकण्याचा प्रयत्न करत असत. तर हुसेन हे 31 वर्षांचे होते. त्याचदरम्यान दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. विजयालक्ष्मी हुसेन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सुरुवातीला हुसेन यांनी यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर ते देखील प्रेमात पडले. विजयलक्ष्मी या प्रेमाबद्दल खूप गंभीर होत्या. त्यांना हुसेन यांच्याशी लग्न करायचे होते. कुटुंबासमोर आपल्या प्रेमाबद्दल त्यांनी सांगितलं होतं. दोघांचे अफेअर मीडियात देखील खूप चर्चिले गेले.