शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद
इतिहास

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी बदलापूर येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग…

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ मे १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून तेथील सोहळ्याचे अध्यक्षपदही भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून येथील सोनिवली गावात नगरपालिकेच्या माध्यमातून एक भव्य स्मारक सुद्धा उभारण्यात येत आहे.

१९२७ मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त बदलापूर गावातील पांडुरंग भास्कर पालये शास्त्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्याची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली सर्व ग्रामस्थांनी त्यांना दुजोरा दिला. गावच्या शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असा ठराव पारित करून घेतला. या कामी त्यांना नानासाहेब चाफेकरांनी, पांडुरंग भोईर अश्या बदलापूर गावांतील अनेकांनी मोलाची साथ दिली.

पालये शास्त्रींनी व्यक्तिश: मुंबईला जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांना शिवजयंती उत्सवासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. जातीय सलोखा वाढीस लागण्याच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण ठरेल, हे ओळखून बाबासाहेबांनीही ते निमंत्रण स्वीकारले आणि त्यानिमित्त आयोजित समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषविले.

मग काय ३ मे १९२७ हा ऐतिहासिक सोनेरी दिवस उगवला बाबासाहेब रेल्वेने कल्याण पर्यंत आले. कल्याण पासून बग्गी (घोडागाडी) ने बदलापूरला निघाले, वाटेत बाबासाहेबांना भेटायला त्यांचं दर्शन घ्यायला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.

हजारो लोकांना भेटत बाबासाहेब बदलापूरला पोहचले. त्यावेळी बदलापूर गावच्या नदीवरून जाण्याची सोय नव्हती पाण्यातून जावे लागत असे, पण बाबासाहेब येणार म्हणून उत्सव कमिटीने नानासाहेब चाफेकरांच्या नेतृत्वाखाली या नदीवर एक लाकडी पुल बांधला होता. अश्या रीतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर बदलापूरला पोहचले आणि त्या ऐतिहासिक शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारले. बाबासाहेबांनी एक तासाचे भाषण देखील केले. सर्वांना एकत्र येण्याची आवाहन करत समाजाच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा असेही सांगितले.

त्यानंतर पालये शास्त्रींच्या घरी बाबासाहेबांनी भोजन घेऊन त्यांनी मुक्कामही केला. बदलापूरसारख्या त्या वेळी अगदी छोटय़ा गावात घडलेली ही घटना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने मोठी आणि महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नव्या पिढीला या घटनेचे स्मरण व्हावे