Post
काम-धंदा

खुशखबर! पोस्टात निघाली मोठी भरती; 3000 पेक्षा अधिक जागा

नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी झटणारेही आपण पाहिले असतीलच. अशा सर्वांसाठी भारतीय टपाल विभागात नोकरी मिळू शकते. पोस्ट विभागात सध्या हजारो पदे रिक्त आहेत. त्या-त्या पदांनुसार आता रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तमिळनाडू सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) च्या 3000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टपाल खात्यात ग्राम डाक सेवक (जीडीएस)पदांवर नोकरी मिळविण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट appost.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. तमिळनाडू पोस्टल सर्कल भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (जीडीएस )च्या 3162 पदांची भरती करण्यात येणार आहे.

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 01 सप्टेंबर 2020

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2020

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत