गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान
काम-धंदा

गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली : गौतम अदानी यांना मोठा झटकाबसला असून १.१ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ७० हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. बुधवारी गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास ४ अब्ज डॉलर्सने घसरून ६७.६ अब्ज डॉलरवर गेली. यामुळे आता चीनचा उद्योगपती झोंग शशान पुन्हा आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. तसेच मुकेश अंबानी अजूनही ८४.५ अब्ज डॉलर्स नेटवर्थ सोबत आशिया देशातील सर्वात श्रीमंत आहेत.

अदानी गृपचे शेअर सोमवारपासून सतत घसरत आहेत. आज (गुरुवारी) ही बीएसईमध्ये अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स अंदाजे ८.५ टक्क्यांनी घसरून ६४५.३५ रुपयांवर गेले. या व्यतिरिक्त आज अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ५ टक्के लोअर सर्किट लावण्यात आले आहे.

का कोसळत आहेत अदानी ग्रुपचे शेअर्स?
शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. त्यामुळे सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव घसरू लागले आणि ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स २५ टक्क्यांनी घसरले, तर सर्व ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सनी खालची पातळी गाठली.