महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद
काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे. यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. शिवाय २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्यामुळे सलग चार दिवस काम बंद राहणार आहेत.

गोव्यात १७ डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, १८ डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम आणि १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन असल्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तर ३० डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि ३१ डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यामध्ये बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.