बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा
काम-धंदा

बँकांची कामे करायची आहेत? तर आधी एप्रिल महिन्याच्या सुट्या पाहा

मुंबई : एप्रिलच्या सुरुवातीला काही दिवस सलग बँका बंद होत्या त्यामुळं नागरिकांना अनेक आर्थिक व्यवहार पुढं ढकलावे लागले किंवा रद्द करावे लागले. आता एप्रिल महिन्यात १० एप्रिल पासून विविध सण आणि साप्ताहिक सुट्टी यामुळं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं नागरिकांनी या सुट्ट्यांचे वेळापत्रक बघून आपल्या कामाचे नियोजन केल्यास त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एप्रिलमधे बँकांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये काही सुट्ट्या विधानसभा निवडणूक आणि प्रादेशिक सण यामुळे त्या त्या राज्यांपुरत्याच मर्यादित आहेत, तर एकाच दिवशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांच्या सुट्ट्या आहेत. विशिष्ट दिवस सुटी म्हणून घोषित करण्याचा निर्णय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट, हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अ‍ॅक्ट अँड रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बॅंकांचे खाते बंद करण्याचे काम या तीन बाबींचा विचार करून घेण्यात येतो. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली एप्रिल 2021 मधील सुट्ट्यांची यादी

10 एप्रिल: महिन्याचा दुसरा शनिवार असल्यानं सर्व बँका बंद राहतील.
11 एप्रिल : रविवार
13 एप्रिल : गुढी पाडवा
14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
15 एप्रिल : हिमाचल दिन, बंगाली नवीन वर्षाचा दिवस, बोहाग बिहू, सरहुल
18 एप्रिल : रविवार
21 एप्रिल : श्री राम नवमी
24 एप्रिल : महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं बँका बंद राहतील.
25 एप्रिल: महर्षी पशुराम जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थानमध्ये ही सुट्टी असेल.