नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरी आणि ९५ हजारपर्यंत पगार, आता वेळ घालवू नका ‘ही’ घ्या अर्जाची लिंक
काम-धंदा

नोटा छापण्याच्या कारखान्यात नोकरी आणि ९५ हजारपर्यंत पगार, आता वेळ घालवू नका ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या चलन नोट प्रेस येथे विविध पदंची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चलन नोट प्रेसमध्ये पर्यवेक्षक (Supervisor), कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सुपरवायझर पदाच्या एकूण २२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक इन प्रिंटींग, बीएससी किंवा फूल टाइम डिप्लोमा इन इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांकडे सुपरवायझर पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २७ हजार ६०० ते ९५ हजार ९१० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

ज्युनिअर टेक्निशियनच्या एकूण १०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पूर्णवेळ आयटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे ज्युनिअर टेक्निशियनच्या कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार ७८० ते ६७ हजार ३९० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

१६ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://ibpsonline.ibps.in/cnpnoct22/