BCom विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार
काम-धंदा

BCom विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार

बीकॉम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्यांचे पर्याय उपलब्ध असतात. बीकॉम झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२२ हे वर्ष आता संपणार आहे. पण तुम्हाला अजून नोकरी मिळाली नसेल तर काळजी करू नका. २०२३ मध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची खात्रीशीर नोकरी मिळू शकते. फक्त यासाठी एक अट आहे. ती म्हणजे पुढे दिलेल्यापैकी कोणत्याही एका सेक्टरचा परिश्रमपूर्वक अभ्यास करावा लागेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वास्तविक,व्हिबॉक्स इंडिया स्किल रिपोर्ट २०२३ ( Wheebox India Skills Report 2023) प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात भारतातील विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्या अभ्यासक्रमात जास्त असेल याची माहिती देण्यात आली आहे.

B.com करणाऱ्यांसाठी २०२३ हे वर्ष उत्तम

या अहवालानुसार ज्यांनी बी.कॉम केले आहे किंवा बी.कॉम करत आहेत त्यांच्यासाठी २०२३ हे वर्ष खूप साऱ्या संधी घेऊन येणाऱ्या ठरणार आहे. भारतातील रोजगारक्षमतेच्या बाबतीत बीकॉमचे विद्यार्थी ६०.६२ टक्क्यांसह अव्वल आहेत. बीकॉम हा सध्या तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून त्यात वाणिज्य शाखेसह बारावी उत्तीर्ण झालेल्यांनाच प्रवेश दिला जातो.

‘हे’ अभ्यासक्रम दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर

या अहवालानुसार एमबीए दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमबीए कोर्स करणारे विद्यार्थी या यादीत ६०.१% रोजगारक्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर बी.टेक करणारे विद्यार्थी आहेत. बीई किंवा बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता ५७.४४ टक्के आहे. भारतातील केवळ ५७.४४ टक्के इंजिनीअरिंग विद्यार्थी रोजगारक्षम आहेत.

या क्षेत्रांमध्ये भरपूर नोकऱ्या

व्हिबॉक्स इंडिया स्किल रिपोर्ट २०२३ नुसार, येत्या वर्षात ऑटोमोटिव्ह, इंजिनीअरिंग आणि इंटरनेट व्यवसाय क्षेत्रातील कंपन्या वेगाने हायरिंग करतील. या क्षेत्रांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २० टक्के अधिक नोकऱ्या असतील. या तीन अभ्यासक्रमांचा अभ्यास करत असाल तर काळजी करू नका. आगामी वर्ष तुमच्यासाठी चांगले जाणार आहे.