काम-धंदा

नोकरीची संधी! केंद्रीय गृहमंत्रालयात काही पदांसाठी भरती

मुंबई : केंद्रीय मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये लॉ ऑफिसर ग्रेड वन आणि अकाउंट ऑफिसर या पदांसह आणखी काही पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाची mha.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देवून अर्ज करु शकतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित पदासांठी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी देण्यात आला आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 24 मे 2021 ही शेवटची तारीख असेल. अर्ज भरल्यानंतर सबमीट करण्याआधी सर्व फॉर्म पुन्हा एकदा वाचून घ्यावा. कारण एकही माहिती चुकीची गेली तर अर्ज रद्द होऊ शकतो.

कोणकोणत्या पदांसाठी, नेमकी किती जागांसाठी भरती?
लॉ ऑफिसर : 03
सीनियर अकाउंट्स ऑफिसर : 01
कंन्सल्टेंट : 06
चीफ सुपरवायजर : 05

पदांसाठी नेमकी पात्रता काय?
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नोकरीबाबत जारी करण्यात आलेल्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी लागणाऱ्या पात्रतेची देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यापैकी लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉची डिग्री शिक्षण घेण्याची अट आहे. याशिवाय अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असावा. तसेच सीनियर अकाउंट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकारमध्ये सिनियर लेव्हलचा अकाउंट ऑफिसरची जबाबदारी दिली जाईल. याबाबतची ऑफिशियल जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा.

पगारासंबंधित माहिती
लॉ ऑफिसर पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 35 ते 60 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. तर चीफ सुपवायझर पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराला 60 हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सुपरवायजर पदासाठी नियुक्त झालेल्या अर्जदाराला 40 हजारपर्यंत पगार मिळणार आहे.

वयोमर्यादा किती?
सर्वच पदांसाठी जास्तीत जास्त वयाची अट ही 65 वर्षांची असेल. याबाबतची सविस्तर माहिती बघण्यासाठी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *