काम-धंदा

सुवर्णसंधी ! इंडियन ऑइलमध्ये निघाली आहे भरती; असा करा अर्ज

नवी दिल्ली : कोरोनानंतर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या असल्या तरी एक मोठी बातमी असून इंडियन ऑईलमध्ये भरती निघाली आहे. भारत सरकारच्या इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या कंपनीने कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जर तुम्ही या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली असेल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकता. अर्ज भरण्याकरता तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. सरकारी नोकरी करण्यासाठी ही एक मोठी संधी असून पगारही चांगला आहे.

कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक या पदासाठी ही भरती होत असून एकूणइ ५७ रिक्त जागा भरावयाच्या आहेत. अभियंता क्षेत्रात डिप्लोमा किंवा बी. एससी झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. वयाची अट १८ ते २६ वर्षे ठेवण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण पानीपत (हरियाणा)मध्ये असून २५ हजार ते १ लाख ५ हजार दरमहापर्यंत योग्यतेनुसार पगार मिळणार आहे.

– ऑनलाईन अर्ज सबमिशन सुरू – १२ ऑक्टोबर २०२०
– अंतिम तारीख – ७ नोव्हेंबर २०२०
– लेखी परीक्षा – २९ नोव्हेंबर २०२०

असा करा अर्ज
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी निघालेल्या भर्तीसाठी तुम्हाला कंपनीच्या https://www.iocl.com किंवा https://www.iocrefrecruit.in/ संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर भर्ती संबंधी आणि ऑनलाईन अर्जासंबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत