नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पॅरामेडिकलचे अभ्यासक्रम (Govt Paramedical Colleges in maharashtra) तर आहेत. मात्र, प्रवेश सेवा नियमात त्यांचा समावेश नसल्याने हे शिक्षण घेणाऱ्यांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पदभरती सेवा प्रवेशात या अभ्यासक्रमांचाही समावेश करण्याची मागणी असोसिएशन ऑफ अलाइड हेल्थकेअर प्रोफेशनल्सने वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन केली.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
बीएस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ( कम्युनिटी मेडिसिन ), बीएस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ( फॉरेन्सिक मेडिसिन ), बीएस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ( इमर्जन्सी मेडिसिन ), बीएस्सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी ( इंडोस्कोपी टेक्नॉलॉजी ) हे अभ्यासक्रम २०१०पासून राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. परंतु, कुठल्याच शासकीय पदभरतीत या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. त्यामुळे जवळपास ३ हजारांहून अधिक पदवीधर हा अभ्यासक्रम पूर्ण करूनही बेरोजगार आहेत. त्यामुळे ‘गट-क’मधील संबंधित पदांसाठी लवकरात लवकर सेवा प्रवेश नियम तयार करावेत, अशी संघटनेची मागणी आहे.