MHT CET 2022: कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट
काम-धंदा

MHT CET 2022: कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

MHT CET 2022 Admit Card: PCB आणि PCM पुनर्परीक्षेसाठी एमएचटी सीईटी २०२२ ( MHT CET 2022) चे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. MHT CET 2022 च्या पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- mahacet.org वरून त्यांचे प्रवेशपत्र तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, MAHA CET कडून २९ ऑगस्ट २०२२ रोजी MHT CET पुनर्परीक्षा 2022 आयोजित केली जात आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी MHT CET 2022 हॉल तिकीट डाउनलोड करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तांत्रिक त्रुटी, मुसळधार पाऊस आणि इतर कारणांमुळे जे उमेदवार यापूर्वी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करू शकले नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सेल एमएचटी सीईटी २०२२ ची पुनर्परीक्षा आयोजित केली जात आहे. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून त्यांचे पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. अधिकृत वेबसाइटवरून तुमचे एमएचटी सीईटी २०२२ हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

MHT CET 2022 Admit Card: असे करा डाऊनलोड
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवर तुम्हाला MHT CET 2022 चा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. आता एक नवीन वेबपेज उघडेल.

PCB किंवा PCM अभ्यासक्रमांसाठी MHT CET 2022 प्रवेशपत्र या लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन लॉगिन विंडो उघडेल.
अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून येथे सबमिट करा.
आता तुमचे MHT CET 2022 पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, तुमचे पुनर्परीक्षेचे ठिकाण, तारीख, वेळ आणि इतर महत्त्वाचे तपशील तपासा. प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.