एटीएममधून पैसे काढणे आता महागणार
काम-धंदा

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार

मुंबई : एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल. वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर्थिक गैरआर्थिक व्यवहार..
गैर आर्थिक ट्रांझॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे. आर्थिक ट्रांझॅक्शन : पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे. गैर आर्थिक ट्रांझॅक्शन : खात्यावरील बॅलेन्स चेक करणे. दरम्यान, आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

चेक बुकसाठी शुल्क…
एका आर्थिक वर्षात खातेधारकास बॅंक १० पानी चेकबुक देईल. त्यानंतर चेकबुक करता एसबीआय शुल्क आकारणार आहे. १० पानी चेकबुकसाठी आता ४० रुपये आणि त्यावर जीएसटी शुल्क आकारण्यात येणार आहे.