सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ
काम-धंदा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १३ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत तीन मार्चपर्यंत होती. परंतु, अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याने ही मुदत वाढविल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा या आधी मे-जूनमध्ये होत असत. मात्र, विद्यार्थी व पालकांची मागणी आणि नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा लवकर प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले. त्यानुसार १२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेशअर्ज खुले करण्यात आले. ही मुदत तीन मार्चपर्यंत होती. हे अर्ज भरण्याची मुदत आता १३ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठाचे विविध शैक्षणिक विभाग, संशोधन केंद्रे व प्रशाळांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व एकात्मिक अभ्यासक्रम राबविला जातात. यासाठी प्रवेशप्रक्रिया अनिवार्य आहे.

प्रवेश परीक्षा चार एप्रिलला –
विद्यापीठातर्फे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चार एप्रिलला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेशपरीक्षा १८ ते २० मार्च दरम्यान घेतली जाणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेचे निकष आणि प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

OEE SPPU Pune University exam 2025 notification pdf: मुदतवाढीच्या नोटिफिकेशनची पीडीएफ फाईल –
https://campus.unipune.ac.in/CCEP/Documents_2025_26/OEE_Application_2025-26_DateExtension.pdf

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ( SPPU ), पूर्वी पुणे विद्यापीठ , हे भारतातील पुणे शहरात स्थित एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे . त्याची स्थापना १९४९ मध्ये झाली आणि गणेशखिंडच्या शेजारी ४११ एकर (१.६६ किमी २ ) परिसरात पसरलेले आहे. विद्यापीठात ४६ शैक्षणिक विभाग आहेत. येथे सुमारे ३०७ मान्यताप्राप्त संशोधन संस्था आणि ६१२ संलग्न महाविद्यालये आहेत जी पदवीधर आणि पदवीपूर्व अभ्यासक्रम देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *