काम-धंदा

SBI मध्ये होणार तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांची भरती

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. एसबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही देशातील एकमेव बँक आहोत जी भारत सरकारच्या नॅशनल अपरेंटिसशीप स्कीममधील तरुणांना काम देत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने स्वेच्छानिवृत्ती योजना अर्थात व्हीआरएस सुरू करणार असल्याचे वृत्त आले होते. एसबीआयच्या व्हीआरएस योजनेवर बरीच टीका केली जात आहे. आता त्यावर बँकेने खुलासा केला आहे. यावर एसबीआयने म्हटले, व्हिआरएस म्हणजे कॉस्ट कटिंग नव्हे. त्यांना त्यांच्या ऑपरेशन्सच्या सीमा वाढवायच्या आहेत आणि त्याकरता मनुष्यबळाची गरज आहे. याचमुळे 14 हजार नवीन लोकांची भरती केली जाणार आहे. असं बॅंकेने म्हटलं आहे.

सध्या बँकेकडे 2 लाख 50 हजार इतके कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतला आहे. देशातील युवकांना देखील संधी देण्यात बँकेने नेहमी पुढाकार घेतला आहे. असं एसबीआयने म्हटले आहे. यासाठीच बॅंक यावर्षी 14 हजार कर्मचारी नवे भरती करुन घेणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत