शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ
काम-धंदा

शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ

मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४ वर खुला झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये ३९५.३५ अंक, निफ्टी मिडकॅप ५० मध्ये ६७.८५ (०.९२%) गुण, निफ्टी बँक २५५.६० (०.७३%) आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये १२3.५ (०.७५%) अंकांची वाढ झाली आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सने पुन्हा झेप घेतली आहे. गौतम अदानीची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सने वाढली. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सलग दुसर्‍या दिवशी किंमतीत वाढ दिसून येत आहे. यामुळे ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढली आहे. फोर्ब्स रियल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी आता १६ व्या स्थानावर आहेत आणि त्यांची संपत्ती ६७.७ अब्ज डॉलर्स आहे.