मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती
काम-धंदा

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंत्रालयातील कृषी आणि किसान मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अर्थ मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय आदी विभागात ही पदे भरली जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयातील महत्वाच्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीतून पदांवर भरती होणार आहे. विविध मंत्रालयात 29 पदांसाठी संयुक्त सचिव पदासाठी ही भरती होणार आहे. युपीएससीने जाहीरातीत दिलेल्या पदांवर नियुक्ती झाल्यास 2 लाखांपर्यंत मानधन मिळू शकेल.

अर्जदारांना https://www.upsconline.nic.in/ वर अर्ज करता येणार आहे.

योग्यता
अर्जदाराकडे संबधित पदाशी निगडीत पदवी असायला हवी. काही पदांसाठी पदवीत्तर पदवी असायला हवी. संबधित क्षेत्रात 10 वर्षे कामाचा अनुभव हवा.

वयोमर्यादा
अर्जदारांचे वय जास्तीत जास्त 55 वर्षे इतके असायला हवे. आरक्षणाच्या कॅटेगरीनुसार शासकीय नियमांनुसार सूट देण्यात आली आहे.