एका वर्षात दुसरी पगार वाढ; या कंपनीने घेतला मोठा निर्णय
काम-धंदा

एका वर्षात दुसरी पगार वाढ; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

मुंबई : जगभरात कोरोनामुळे मंदीचे वातावरण असताना अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. अशात देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने कोरोना काळात कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा चांगली बातमी दिली आहे. शुक्रवारी कंपनीने पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्‍यांना होईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१पासून लागू होईल. २०२१ मध्ये विप्रोने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला आहे. कंपनीच्या घोषणेनुसार ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्‍यांना लागू असेल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्येही कंपनीने बँड ३ पर्यंतच्या ८० टक्के कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली होती.

सी १ बँडच्या पात्र कर्मचार्‍यांना जूनपासून वाढीव वेतन मिळणे सुरू होईल. या बँडमध्ये व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बँडमधील वेगळ्या देशात स्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी दरवाढ उच्च एकेरी अंकात करण्यात आली आहे. तर ऑनसाइट कर्मचार्‍यांमध्ये, मिड-सिंगल डिजिटमध्ये वाढ झाली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना जास्त पगार देण्यात दिली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

वर्षात दोनदा पगार वाढवणारी विप्रो ही देशातील दुसरी कंपनी बनली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दोनदा पगार वाढवण्याची घोषणा केली होती. टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१ आणि एप्रिल २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत पगार वाढवण्याची घोषणा केली होती. टीसीएसने ६ महिन्यांच्या अंतराने पगार वाढविला. टीसीएस कर्मचार्‍यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४% वाढ झाली आहे.