काम-धंदा

मोठी संधी : या जिल्हा परिषदेत निघाली ३८२४ जागांची भरती

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून संपूर्ण जग काही काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. अशात अनेकांचे जॉब गेले असून अनेकांच्या जॉबवर सध्या टांगती तलवार आहे. अशात बेरोजगारी वाढल्यामुळे आर्थिक मंदी आली आहे. अशातच जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत विविध ३८२४ पदांसाठी भरती निघाली आहे.

पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा १३ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

कोणत्या पदांसाठी किती जागा
फिजिशियन (१०४)
भुलतज्ञ (७१)
वैद्यकीय अधिकारी (४५४)
आयुष वैद्यकीय अधिकारी(४४३)
स्टाफ नर्स (२६८३)
क्ष-किरण तंत्रज्ञ (६९)

अर्ज कुठे करावा?
पात्र उमेदवारांनी covidsolapur2020@gmail.com या मेल आयडीवर ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज कसा करावा?
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमॅट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथं क्लिक करा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) पाहण्यासाठी इथं क्लिक करा